

Soyabean Crop Loss
sakal
अमरावती : खरिपातील सोयाबीन पीक बुडाल्याने शेतकऱ्यांना आता कापूस व तुरीच्या पिकापासून अपेक्षा आहेत. ही दोन्ही पिके हाती येण्यास अवकाश असल्याने व पिकांची स्थिती सोयाबीनच्या तुलनेत बरी असल्याने यातून मिळणाऱ्या मिळकतीवर शेतकऱ्यांची मदार अवलंबून आहे.