Ajit Pawar vs Navneet Rana
esakal
राज्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. अजित पवारांनी भाजपावर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी केली जाते आहे. यावरून नवनीत राणा यांनीही अजित पवारांना मर्यादेत राहण्यात तसेच जबाबदारीने बोलण्याच सल्ला दिला आहे. मात्र, त्याला आता राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी प्रत्युत्रर दिलं आहे. नवनीत राणांनी लायकीत राहावं, असं ते म्हणाले.