Woman's Hair Trapped in Giant Wheel, Scalp Torn Off
esakal
यवतमाळ : तांन्हा पोळ्यानिमित्त आयोजित यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेच्या केसांसह डोक्याची चामडी निघाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी फुलसावंगी येथे घडली. या दुर्घटनेमुळे यात्रेच्या ठिकाणी काही काळ एकच गोंधळ उडाला. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.