सावधान! रेड झोन मधील या जिल्ह्यात मास्क न वापरल्यास होणार दंडात्मक कारवाई

baitha
baitha

बोरगाव मंजू (जि. अकोला) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना बाबतची महत्त्वपूर्ण बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस स्टेशनला घेण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर न केल्यास जनतेला दंड आकारण्यात येईल असे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. 

बाजाराचा परिसर ठरत आहे अडचणीचा
खबरदारीची बाब म्हणून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस तथा सामान्य नागरिकांनी सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. लाॕकडाउन कालावधीत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गावातील सर्व जनतेसाठी फायद्याचेच ठरणार आहे. मात्र, शासन स्तरावरून वारंवार सूचना देवूनही दैनंदिन मिनी भाजी बाजार परिसरात नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. ही अडचण दैनंदिन भाजी बाजाराला जागा अपुरी पडत असल्याचे लक्षात आल्याने भाजी बाजारला आठवडी बाजारात हलविण्याचे नियोजन केले. आठवडी बाजारातील जागेची सुद्धा पहाणी केली आहे.

अशी आहे दंडाची आकारणी
यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येईल. त्यामध्ये मास्क न लावता फिरणे 200 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 300 रुपये, दुकानदारांने सोशल डिस्टन्सिगचे पालन न करणे 2 हजार, नागरिकांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन न करणे 200 रुपये अशी विविध प्रकारची दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक हरिष गवळी, ग्रामविकास अधिकारी विलास देऊळकर, मंडळ अधिकारी राऊत, ग्रामसेवक संदीप गवई, तलाठी राजेंद्र म्हैसने, बोनगीरे, सरपंच प्रतिनिधी दिलीप खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ देशमुख, कुरणखेडचे उपसरपंच सुशील मोहोड, राजेन्द्र देशमुख, रमेश समुद्रे उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com