हे काय? साखरेच्या गाडीत चक्क गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेट

सकाळ वृत्तसेेवा
शनिवार, 2 मे 2020

साखर व गव्हाची वाहतूक करण्यासाठी परवाना घेण्यात आलेल्या वाहनातून चक्क गुटख्याची वाहतूक होत असल्याचे गुरुवारी पोलीस कारवाईत समोर आले. कोतवाली पोलिसांनी एक लाख ६० हजाराचा गुटखा या वाहनातून केला जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

 

 

अकोला: साखर व गव्हाची वाहतूक करण्यासाठी परवाना घेण्यात आलेल्या वाहनातून चक्क गुटख्याची वाहतूक होत असल्याचे गुरुवारी पोलीस कारवाईत समोर आले. कोतवाली पोलिसांनी एक लाख ६० हजाराचा गुटखा या वाहनातून केला जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ३० एबी ३९०३  क्रमांकाचे वाहन जात होते. जीवनावश्यक वस्तू वाहतूक करण्यासाठी असलेल्या परवाना त्यावर चिकटवलेला होता. त्यावर साखर व गहूची वाहतूक करण्यासाठी असा उल्लेख होता; मात्र पोलिसांना या वाहनावर संशय आल्याने त्यांनी वाहन अडवून वाहनात बघितले असता त्यांना राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका दिसून आला.

या वाहनामध्ये गहू व साखर नव्हती. पोलिसांनी सविस्तर चौकशी केली असता हा माल जुने शहरातील नितीन अग्रवाल याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी एक लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा, बिडी, सिगारेट व तंबाखू जप्त केला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचित केले. ही कारवाई सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय जायभाये, प्रदीप बोदडे व हरणे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola police catch truck loaded with tobacco cigarette