राष्ट्रसंतांच्या विचारांनी घडलेला कार्यकर्ता विधान परिषदेत गुरुदेव सेवा मंडळातून मिळाले अमोल मिटकरी यांना सेवेचे बाळकडू

akola  Amol Mitkari got service from Gurudev Seva Mandal
akola Amol Mitkari got service from Gurudev Seva Mandal


अकोला :‘सेवेने अंगी सामर्थ्य येते । जे जे बोलाल तेचि घडते।
हस्ते परहस्ते सर्वाचि होते ।काम त्याचे।।
लोकांस एकदा भरवसा आला ।
म्हणजे सेवा रुजू झाली भगवंताला।।
मग काय उणे असे त्याला? । मागेल ते ये धावोनिय।।'

या राष्ट्रसंत तुकजोडी महाराजांच्या विचारांतून घडलेला कार्यकर्ता अमोल मिटकरी विधान परिषदेत लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांनी घडलेल्या या गुरुदेवा सेवकाला सेवेचे बाळकडूनही श्री गुरुदेवा मंडळातूनच मिळाले आहे. त्यामुळे आज तमात गुरुदेव सेवकांना अमोलच्या निवडीचा हर्ष झाला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झाले आहे. चारही प्रमुख पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. त्यात सर्व तर्कवितर्कांना डावलून राष्ट्रवादीतर्फे जे ना पुढे आले ते म्हणजे अमोल मिटकरी. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेची उमेदवारी ही गडगंज संपत्तीच्या बळावर किंवा वडिलांच्या पिढीजात वारसा हक्काने मिळविता येते ही प्रथाच अमोल मिटकरी यांच्या रुपाने खोडून निघाली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता अमोल मिटकरी हा कुशल वकृत्वाचा धनी. रोखठोकपणे सत्य मांडणारा निर्भीड वक्ता म्हणून त्याची ओळख. संत तुकाराम महाराजांपासून तर संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, संत श्री बसवेश्वर, संत रोहिदास अशा सर्व संत मालिकेतील संत साहित्याचा सखोल अभ्यास असलेले हे व्यक्तीमत्त्व. अमोल मिटकरी यांना सेवेचे बाळकडू श्री गुरुदेव सेवा मंडळातूनच मिळाले आहे.

पाटसुल येथील डॉ. गाडेकर महाराज यांच्या आश्रमांमध्ये बाल संस्कार शिबिरांमध्ये त्यांनी हे धडे घेतले. व्यासपीठावर लोकांच्या मनातील भावना पोटतिडकीने मांडणारा व्यक्ता म्हणून आजपर्यंत अमोलची ओळख होती. आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसलेल्यानंतर त्याच आत्मियतेने लोकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडेल, असा विश्वास आहे.

मराठा सेवा संघाचीची पार्श्वभूमी
अमोल मिटकरी यांनी काही वर्ष मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मध्येही कार्य केले. एक सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचा पुत्र आमदार झाल्याने संपूर्ण श्री गुरुदेव परिवार आज आनंदी आहे. राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांना स्थान नसते, हा समजही आज अमोलच्या रुपाने खोडला गेला आहे.

पश्चिम विदर्भात राष्ट्रवादीचा चेहरा
राष्ट्रवादी काँग्रेसकडे पश्चिम विदर्भात सर्वमान्य असा चेहरा नव्हता. अमोल मिटकरीच्या रुपाने अजितदादांनी तो दिला आहे. पूर्व विदर्भात दिग्गज नेते असताना पश्चिम विदर्भात मात्र राष्ट्रवादीची पाटी नेहमीच कोरी राहली आहे. ही कमरताही अमोलने भरून काढली.

प्रस्थापित खुल्या मनाने स्वीकारतील का?
राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापितांचा पक्ष. या पक्षातील दिग्गज म्हणून घेणारे नेते अमोल मिटकर यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला पश्चिम विदर्भातील नेता म्हणून खुल्या मनाने सहजासहजी स्वीकारणार नाहीत. त्यासाठी अमोल मिटकरी यांनाच पुढाकार घेवून या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com