esakal | बाप रे बाप...अकोला राज्यात हॉट
sakal

बोलून बातमी शोधा

Hot.jpg

सर्वाधिक तापमानाच्या नोंदीसह रविवारी (ता.३) अकोला राज्यात हॉटेस्ट ठरला तसेच पारा 44.9 अंशावर गेल्याने यावर्षीचे अकोल्यामधील उच्चांक तापमान मोजले गेले. शिवाय हवामान विभागाने आठवड्याभरात उष्णतेची लाट सांगितल्याने पुन्हा नवा उच्चांक नोंदला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविली जात आहे.

बाप रे बाप...अकोला राज्यात हॉट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सर्वाधिक तापमानाच्या नोंदीसह रविवारी (ता.३) अकोला राज्यात हॉटेस्ट ठरला तसेच पारा 44.9 अंशावर गेल्याने यावर्षीचे अकोल्यामधील उच्चांक तापमान मोजले गेले. शिवाय हवामान विभागाने आठवड्याभरात उष्णतेची लाट सांगितल्याने पुन्हा नवा उच्चांक नोंदला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या चार ते पाच वर्षापासून सूर्याचा कहर अकोलेकरांना सोसावा लागत असून, 47 ते 48 अंशसेल्सिअस पर्यंतच्या तापमानाचा सामना करावा लागला आहे. यंदाही एप्रिलपासून सरासरी 40 पेक्षा अधिक तापमान जाणवत आहे तर, ‘मे’च्या पहिल्याच आठवड्यात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता सर्वाधिक होती. सकाळी 9 वाजतापासूनच ऊन जोर धरत असल्याने सूर्य मावळेपर्यंत भट्टीप्रमाणे जमीन तापत आहे.

सुरक्षा एकच, भरपूर पाणी प्या
दिवसभर उन्हाचे चटके, उष्ण झळा आणि घामाच्या धारा फुटत आहेत. त्यामुळे शरिरातील पाणी कमी होऊन उष्माघात व डिहायड्रेशनचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी दिवसभर भरपूर पाणी पिणे, ही एकमेव सुरक्षा असल्याचे आरोग्य विभाग सूचवित आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
अकोला 44.9, मुंबई (कुलाबा) 34.6, सांताक्रूझ 33.8, अलिबाग 33.8, रत्नागिरी 34.2, पणजी (गोवा) 35.3, डहाणू 34.7, पुणे 39.1, जळगाव 43.6, कोल्हापूर 37.8, महाबळेश्वर 32.1, मालेगाव 42.2, नाशिक 38.9, सांगली 38.2, सोलापूर 42.8, औरंगाबाद 41.5, परभणी 44.2, नांदेड 44.0, बीड 42.5, अमरावती 43.8, बुलडाणा 41.4, ब्रम्हपुरी 44.1, चंद्रपूर 43.8, गोंदिया 42.6, नागपूर 44.2, वर्धा 44.2.