मोठ्या मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत 

akola buldana Adequate water supply in large medium projects, raising the hopes of farmers
akola buldana Adequate water supply in large medium projects, raising the hopes of farmers

बुलडाणा  : आजवर झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. यापैकी दोन मोठे प्रकल्प व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे पन्नास टक्के पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा हे तीन मोठे प्रकल्प आहेत. तर पलढग, ज्ञानगंगा, कोराडी, मन, तोरणा व उतावळी हे मध्यम प्रकल्प आहेत.


त्यापैकी मोठा प्रकल्प असलेल्या मोताळा जवळील नळगंगा प्रकल्पात 35.3 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. प्रकल्पाची आजची टक्केवारी 50.53% आहे. त्या खालोखाल मेहकर तालुक्‍यातील पेनटाकळी प्रकल्पात सुमारे पन्नास टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. आजवर या प्रकल्पामध्ये 29.86 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तर खडकपूर्णा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 29.9 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून याची टक्केवारी 32.1 अशी आहे. पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये ज्ञानगंगा मध्ये 57 टक्के, मस प्रकल्पात 46 टक्के, कोराडी मध्ये 56 टक्के, मन प्रकल्पात 48 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे जिल्ह्याच्या सर्वच भागात आजवर समाधानकारक पाऊस पडलेला आहे. या प्रकल्पांशिवाय जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जैन संघटनेच्या उपक्रमांचाही फायदा
याशिवाय भारतीय जैन संघटनेने जलस्त्रोतांमधील गाळ काढण्याच्या उपक्रम राबविल्याने पाणी संचय क्षमता देखील वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरात केलेल्या शेत तलाव, पाझर तलाव यामध्येही चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. मात्र पूर्ण क्षमतेने हे प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.

सार्वत्रिक पावसाची हजेरी
जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. आजवरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी 223 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. या पावसाची एकूण पडणाऱ्या पावसाची टक्केवारी 30.11 एवढी आहे. आजवर झालेला पाऊस पुढीलप्रमाणे बुलडाणा 272.8, चिखली 233.2, देऊळगाव राजा 227.8, सिंदखेड राजा 285.8, लोणार 236.1, मेहकर 206.8, खामगाव 144.9, शेगाव 167, मलकापूर 291, नांदुरा 216.2, मोताळा 131.7, संग्रामपूर 293, जळगाव जामोद 274.6 मिलीमीटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com