अरे हे काय? लॉकडाउनमुळे अंनेकांचे संसार आले उघड्यावर; घराचे स्वप्न अधूरे

gharkul.jpg
gharkul.jpg

तरोडा (जि. अकोला) : गेल्यावर्षी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी फाईल तयार केली. संबंधित विभागाकडून मंजुरीही मिळाली परंतु, मधातच अवकाळी पाऊस, पावसाचा कसाबसा सामना केला. आता उन्हाळ्यात तरी घर मिळेल या आशेने अकोट तालुक्यातील अनेक नागरिक होते. अनेकांनी तसे स्वप्नही रंगविले होते. परंतु, जगभरात थैमान खालणाऱ्या कोरोनामुळे देशासह राज्यात लॉकडाउन करण्यात आले. लॉकडाउनचा पहिला काळ गेला, दुसरा गेला, तिसरा जात नाही तोच चौथ्या लॉकडाउनची शासनाकडून घोषणा करण्यात आली. आणि 2019 च्या सुरुवातीपासून घरांचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांवार कोरोनाचे पाणी फेरल्या गेल्या. त्याचबरोबर शासकीय कार्यालयातील कामकाजावर फरक पडला. आणि घरकुलांचे हप्ते देण्यासही टाळाटाळीस सुरुवात झाली.

अनेक अडचणी येत आहेत समोर
शासनाकडून कमी उत्पन्न घेणाऱ्या गरीब-गरजू कुटुंबाला रमाई घरकुल व इतर अशा योजनेच्या माध्यामातून घरकुलांचा लाभ दिल्या जातो. आता पंतप्रधान आवास योजनेमधून प्रत्येकाला घरकुलाचा लाभ दिल्या जात आहे. त्याकारणाने अकोट तालुक्यातील अनेक नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतकडे कागदांची फाईल तयार केली. कोणा-कोणाला योजनेची मंजुरात देण्यात आली. परंतु, गेल्यावर्षी सुरुवातीला परिसरात पाणी नसल्याने, बांधकामास मंजुरी देण्यात आली नाही. त्यानंंतर पाऊस जास्त प्रमाणात असल्याने पुन्हा घर बांधण्याचे घोडे अडले.

पावसाचा हंगाम गेल्यावर घरकुलाचे काम करू शकू म्हणून, तुटक्या-मुटक्या झोपडीत लहान मुला-बाळांसोबत कसाबसा पावसाचा सामना केला. पाऊस गेला, आता घरकुलाचे काम करू असा मनात विचार येत नाही तोच जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने सर्व स्वप्नावर विरजण केले. आधी 15 दिवसांचा नंतर हळुहळु वाढत असलेल्या लॉकडाउनने हा हंगामही तुटक्या-मुकट्या झोपडीत किंवा अर्धवट घरांमध्येच जाणार आहे. पुढे पावसाचे सावट आहे. त्यामुळे पुन्हा घर बांधण्यात अडचण निर्माण होणार असल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे कोरोनाने उघड्यावर संसास आणला असे म्हटल्यास काही वागवे होणार नाही.

अनेक जण राहतात झोपडीत
लॉकडाउनमुळे ग्रामीण परिसरात अनेक घरकुल योजनेचे लाभार्थी पडलेल्या घरात, झोपडीत किंवा अर्धवट बांधलेल्या घरातच राहत आहेत. मंजुरी मिळून देखील संबंधित विभागाकडून धनादेशाचे वाटप करण्यात नाही आले. त्यामुळे सद्यातरी अनेकांना घरांचे स्वप्न झोपडीच पाहावे लागणार आहे.

पाण्यातच दिवस काढावे लागतील
घरकुलाची फाईल देऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरी देखील माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता पावसाळ्यात घरात कसे राहावे. हा मोठा प्रश्‍न पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला आहे.
-गोपाल पाटेकर, लाभार्थी नागरिक, तरोडा

शासनाने लवकरच पैसे खात्यात जमा करावे
अकोट तालुक्यातील बरेच नागरिक अजुनही उघड्यावरच आपला संसार करत आहेत. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ज्यांचे घरकुलाचे पैसे थांबलेले आहेत त्याच्या घात्यात पैसे जमा करावे. निदान ते नागरिक आपल्या घरावर टिन पत्रे टाकुन घरात सुख-रुप राहू शकतील.
-विलास साबळे, सरपंच, तरोडा

इंजिनियर ‘नॉट रिचेबल’
घरकुलाचे ऑनलाइन हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात टाकणारे संबंधित विभागाचे इंजिनियर यांच्याशी याबाबत विचारणा करण्यासाठी अनेक वेळा फोन केला असता ते सतत ‘नॉट रिचेबल’ येत होते.

लाभार्थ्यांच्या फाईली पंचायत समितीला पाठविल्या आहेत. लॉकडाउन सुरू असल्यामुळ काही अडचणी येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
-व्हि. बी. राठोड, ग्रामसचिव, तरोडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com