
अकोला शहरात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसल यांची एका गुंडाने हत्या केली आहे. अकोल्यातल्या रणपिसे नगरातील या हत्यांकांडाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.