Akola Crime News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार ; पतीविरुद्ध गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Husband strangles

Akola Crime News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार ; पतीविरुद्ध गुन्हे

अकोला : त्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध विद्यमान न्यायालयाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.खदान परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पती मला दररोज मारहाण करून अश्लील शिवीगाळ करतो तसेच माझ्यावर दररोज बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचा आरोप केला आहे.

खदान पोलिस स्टेशनला तशी तक्रार देण्यात आली होती. पती-पत्नीतील आपसी भांडण असल्याचे सांगत पोलिसांनी सदर पीडिता पत्नीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर सदर पीडित पत्नीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना तक्रार दाखल करून दिली; पण सदर प्रकरणी परत पती-पत्नीतील आपसी वाद असल्याचे कारण सांगत तिला न्यायालयात जाण्याचे सांगण्यात आले.

पीडिता पत्नीने याप्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावत खाजगी तक्रार ॲड. सुमित महेश बजाज यांच्या वतीने न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी सोमवारी दुपारी सुनावणी झाली.

यामध्ये विद्यमान न्यायालयाने पीडितांचे वकील ॲड. सुमित महेश बजाज व ॲड. भाग्यश्री किटे यांनी बाजू मांडली. आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३७७, ३२३, २९४ नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या प्रथमश्रेणी न्यायाधीश श्रीमती व्ही.पी. दुर्वे यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आरोपीला अटक करण्याचे पोलिसांना बजावले आहे.