डाकिया ‘कॅश’ लाया!

postman story
postman story
Updated on

अकोला : गावगाड्यापर्यंत ‘डाकीया अर्थात पोस्टमन’ टपालासोबत ‘कॅश’ आणि गरजेच्या वस्तूही घेवून पोहोचला. लॉकडाउनच्या काळात कोणतीही व्यवस्था नसताना पोस्ट खात्याने मात्र जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यात पोहोचून महिनाभरात एक कोटीपेक्षा अधिक रक्कम घरपोच दिली.


कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाचा एक भाग म्हणून गेले महिनाभरापासून अधिक काळ लॉकडाउन आहे. या काळामध्ये अनेक घटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या स्मस्यांमधून मार्ग काढत मार्गक्रमण करण्यात प्रशासन सर्वोतोपरी मदत करीत आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे भारतीय डाक विभागाची ‘आधार संलग्नित पेमेंट व्यवस्था’(एईपीसएस) ही सेवा. या सेवेमुळे 4891 लोकांना एक कोटी पाच लक्ष 65 हजार 936 रुपयांची रक्कम घरपोच पोहोचविण्यात आली आहे. या सेवेत बॅंक खात्यात जमा होणारी पेन्शन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना दिले जाणारे लाभ यांचा समावेश आहे.


43 उपडाकघर व 354 शाखांमधून सेवा
अकोला डाक विभागांतर्गत अकोला व वाशीम या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यात अकोला येथील विभागीय कार्यालय, प्रधान डाकघर कार्यालय, मुख्य डाकघर कार्यालय, 43 उपडाकघर कार्यालये व 354 शाखा डाकघर कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमार्फत ही सुविधा लोकांना पुरविली जात आहे.


असा घ्या सेवेचा लाभ
अकोला डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक व्ही. के. मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेत जे नागरिक घराबाहेर येऊ शकत नाहीत, त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बॅंक खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम पोस्टमनमार्फत घरपोच अदा केली जाते. त्यासाठी 0724 -2415039 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळात नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम आणि हवे असलेल्या साहित्याची माहिती देणे आवश्‍यक आहे.


बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक
हेल्पलाईन नंबरवर भारतीय डाक विभागाकडे ग्राहक आपल्या बॅंक खात्यातील रकमेची मागणी नोंदवतात. त्याप्रमाणे पोस्टमन त्या ग्राहकाकडे घरी जाऊन बॅंक खात्याशी ऑनलाईन जोडून घेतो. ग्राहकाचे बॅंकेशी आधार क्रमांकावरून बायोमेट्रीक पडताळणी होते. ती खातरजमा झाल्यावरच ग्राहकाला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे रक्कम पोहोचविली जाते.


औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही
टपाल विभाग हा ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही पुरविण्याची सेवा देत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लागणारी औषधे व त्यांच्या अन्य आवश्यकतांनुसार वस्तूंची उपलब्धता सशुल्क केली जाते. यात ने-आण साठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत; मात्र वस्तूची किंमत मात्र ग्राहकाला अदा करावी लागते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com