Microfinance representatives in Akola face allegations of photographing a farmer’s family during loan recovery.
esakal
अकोला: राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जवसुलीतून दिलासा देण्याच्या घोषणा सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री आणि नेत्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात पतसंस्था, छोट्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.