Akola : मुदत संपल्यानंतरही मोफत डोस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

Akola : मुदत संपल्यानंतरही मोफत डोस

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १८ ते ५९ वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना मोफत बुस्टर डोस देण्यात आले. त्यासाळी लाभार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मोफत बुस्टर डोस देण्याची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. सदर डेडलाईन संपल्यानंतर सुद्धा सध्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना मोफत डोस देण्यात येत आहेत. परंतु लाभार्थ्यांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले.

१ एप्रिल २०२१ पासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. त्यामुळे या वयोगटासाठी मोहीम सुरू झाल्यानंतर अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहोचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली.

अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी १५ वर्षावरील युवकांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान केंद्र शासनाने लसीकरण वाढवण्यासाठी ७५ दिवस मोफत बुस्टर डोस देण्याचे जाहीर केले. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली परंतु त्यानंतर सुद्धा आरोग्य विभागामार्फत नागरिकांना मोफत डोस देण्यात येत आहेत.

कोर्बेव्हॅक्सचा पर्याय

जिल्ह्यात अधून मधून कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लाभार्थ्यांना कोर्बेव्हॅक्स लस देवून त्यांना बुस्टरचा लाभ देण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक आता लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत.

केंद्र शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मोफत बुस्टर डोस देण्यात आले. परंतु शासनाने मोफत बुस्टर डोस देण्याची मोहीम थांबवण्याचे कोणतेही निर्देश दिले नाहीत. याव्यतिरिक्त ऑनलाईन सुद्धा मोफत डोस देण्याची सुविधा सुरु असल्याने नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचा बुस्टर डोस देण्यात येत आहे.

- डॉ. विनोद करंजीकरजिल्हा लसीकरण अधिकारी, अकोलाकेंद्र शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मोफत बुस्टर डोस देण्यात आले. परंतु शासनाने मोफत बुस्टर डोस देण्याची मोहीम थांबवण्याचे कोणतेही निर्देश दिले नाहीत. याव्यतिरिक्त ऑनलाईन सुद्धा मोफत डोस देण्याची सुविधा सुरु असल्याने नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचा बुस्टर डोस देण्यात येत आहे.

- डॉ. विनोद करंजीकरजिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला