esakal | अकोला सर्वाधिक हाॅट...
sakal

बोलून बातमी शोधा

Akola is the hotest city in maharashtra tempreture

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे

अकोला सर्वाधिक हाॅट...

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तर शुक्रवार (ता.१) विदर्भात सर्वाधिक ४२ अंश तापमान अकोला जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. 

राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी तुरळक  पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तर विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे होते. 

कोकण आणि गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय तर उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

अकोला सर्वाधिक हॉट
गेल्या चोविस तासात हवामान विभागाच्या नोंदीनुसार   महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोला ४४.३ अंश नोंदविण्यात आली. तर मुंबई ३४.४, रत्नागिरी ३४.७, पुणे ३८. ७, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३४.८, मालेगाव ४२.६, नाशिक ३७.५, सांगली ३७.६, सोलापूर ४१.३, औरंगाबाद४०.४, परभणी ४३.५, नांदेड ३७.५, बीड ४२.०, अमरावती ३८.८, चंद्रपूर ४१.५, गोंदीया ३९.४, नागपूर ४१.३ तर वाशीम ४३ आणि वर्धा ४१ अंश सेल्सियॉअस नोंदविल्या गेले. 


दुहेरी संकट
कमाल तापमानात वाढ होत असतानाच आता राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने महाराष्ट्रावर पहिले कोरोना आणि आता अवकाळी पाऊस असे दुहेरी संकट कोसळले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात आला होता. या व्यतीरिक्त पुढील पाच दिवसांसाठी संपुर्ण राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: २९ ते ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि राज्याचा दक्षिण भागाला पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुढील पाच दिवसांसाठी ज्या जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात आला आहेत; त्या जिल्हयांमध्ये अकोला, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, सिंधूदुर्ग, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली आणि भंडारा या जिल्हयांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच दुसरीकडे कमाल तापमानाने कहर केला आहे. आताच कुठे मे महिन्याला सुरुवात झाली असली प्रचंड उकाड्याने नागरिकांना घाम फोडला आहे.