Lockdown : आदर्श विवाह करून कोरोना लढ्यात दिली भरगच्च मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

सामाजिक जबाबदारीचे भान राखत दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान सहाय्यता निधीला 21 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच हजार 100 रुपयाचा निधी वर-वधूंच्या हस्ते आमदार प्रकाश भारसाकळे यांना दिले. शिवाय वर-वधूंच्या हस्ते हिवरखेड मधील 100 असहाय, निराधार, दिव्यांग व गरजू लोकांना प्रत्येकी 500 रुपयाचे किराणा वस्तुंचे वाटप सुद्धा केले.

हिवरखेड (जि. अकोला) : येथील जि. प. सदस्या आणि माजी सरपंच सुलभाताई दुतोंडे व संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे कार्यकर्ते, माजी पं.स.सदस्य रमेश दुतोंडे यांचे चिरंजीव मंगेश व उमरा ता.पातूर जि. अकोला श्री गजानन विश्वनाथ शिंदे यांची सुकन्या शुभांगी यांचा शुभविवाह ता. 27 एप्रिल रोजी सोशल डिस्टन्सिंग पाळत आणि शासनाच्या निर्देशाचे पालन करत दोन्हीकडील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आदर्श विवाह उत्साहात पार पडला.

हेही वाचा- वृद्ध दाम्पत्याच्या इच्छा शक्तीला सलाम

अनेकांनी केले निर्णयाचे स्वागत
विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे दुतोंडे कुटुंबियांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान सहाय्यता निधीला 21 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच हजार 100 रुपयाचा निधी वर-वधूंच्या हस्ते आमदार प्रकाश भारसाकळे यांना दिले.

शिवाय वर-वधूंच्या हस्ते हिवरखेड मधील 100 असहाय, निराधार, दिव्यांग व गरजू लोकांना प्रत्येकी 500 रुपयाचे किराणा वस्तुंचे वाटप सुद्धा केले. त्यांच्या निर्णयाचे कौतुक संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीने स्वागत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola An ideal marriage took place in Hivarkhed