esakal | Video: अकोला ‘लॉक डाऊन’; तीन दिवस जिल्हा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola 'Lock Down'; District closed for three days

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांच्या धर्तीवर आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 22 मार्च ते 24 मार्च या कालावधीत जिल्हा ‘लॉक डाऊन’ करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. 

Video: अकोला ‘लॉक डाऊन’; तीन दिवस जिल्हा बंद

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांच्या धर्तीवर आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 22 मार्च ते 24 मार्च या कालावधीत जिल्हा ‘लॉक डाऊन’ करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, खबरदारीच्या  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

व्हिडिओ पहा :

कोरोनाची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने गर्दी टाळण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी कोरोनाबाधीत व्यक्ती आल्यास तिच्यापासून इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 22 मार्च ते 24 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आहे.
 

loading image