Akola Mahayuti Meet: Amol Mitkari Excluded
esakal
अकोला, ता. २७ : अकोल्यात भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक सुरू असताना पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना चर्चेतून दूर ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील आर.जी. हॉटेलमध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यात ही बैठक होत असून, तिकिट वाटपाचा तिढा यामधून सुटण्याची शक्यता आहे.