esakal | अरे देवा ! पहिलाच पाऊस अन् या तालुक्यातील मुख्य रस्ते झाले चिखलमय !
sakal

बोलून बातमी शोधा

telhara road.jpg

पावसाळा सुरू होताच तेल्हारा-हिवरखेड, अडसूड, वरवट-तेल्हारा, पाथर्डी मार्गे अकोट रस्त्यावर सर्वीकडे चिखलच-चिखल झाल्याने दुचाकीसह चारचाकी, पायी चालणाऱ्या नागरिकांना कंत्राटदाराच्या उदासीन धोरणामुळे पहिल्याच पावसात त्रास सहन करावा लागला. आता हा त्रास या पावसापासून पुढच्या पावसापर्यंत राहणार काय असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

अरे देवा ! पहिलाच पाऊस अन् या तालुक्यातील मुख्य रस्ते झाले चिखलमय !

sakal_logo
By
पंकज भारसाकळे

तेल्हारा (जि. अकोला) : आधी उन्हाळ्यात धूर-मातीसह अनेक समस्यांचा सामना केल्यानंतर पावसाळा सुरू होताच तेल्हारा-हिवरखेड, अडसूड, वरवट-तेल्हारा, पाथर्डी मार्गे अकोट रस्त्यावर सर्वीकडे चिखलच-चिखल झाल्याने दुचाकीसह चारचाकी, पायी चालणाऱ्या नागरिकांना कंत्राटदाराच्या उदासीन धोरणामुळे पहिल्याच पावसात त्रास सहन करावा लागला. आता हा त्रास या पावसापासून पुढच्या पावसापर्यंत राहणार काय असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

क्लिक करा- अरे वा...978 पैकी 606 जण कोरोनामुक्त

आधी धुळीने होते त्रस्त
मुख्य रस्त्यावर सर्व प्रथम पैचेस करण्यात आले त्यांनतर 23 मार्च पासून लॉकडाउन लागलेल्या रत्याचे कामे बंद पडली. कामावरील मजुरांना परत घरी जावे लागले त्यामुळे सदर रत्याचे काम बंद पडले. परंतु, पैचेस केलेल्या पिवळ्या मातीवर तातडीने त्यावर मुरूम टाकणे अति आवश्यक होते. मात्र, लॉकडाउन मुळे सर्व काम विस्कळीत झाले. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा भर धुळीने त्रस्त झाल्यावर मे महिन्याच्या अखेरीस राज्य शासनाने निर्णय घेत सर्व रस्ते विकास कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने काम होणे अपेक्षित होते.

हेही वाचा- कोरोनामुळे विघ्नहर्ताही संकटात; साध्या पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव

फौजदारीची काढली नोटीस
संबंधित कंत्राटदार व प्रशासकीय यंत्रनेच्या हलगर्जी पणामुळे रस्ते काम तसेच राहलेले काम जून च्या पहिल्याच पावसात सर्व रस्ते चिखलमय झाल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहने अडून पडली ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी तातडीने बैठक घेत 8 दिवसात रस्ते वाहतूक योग्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक अभियंतांना आदेशीत केले. त्यावर लगेच कारवाई करत अधीक्षक अभियंता यांनी संबंधित कंत्राटदारांना तातडीने काम सुरू करण्याची नोटीस काढत फौजदारी कारवाहीची आदेश दिल्याने कंत्राटदारांनी पिवळ्या मातीवर मुरुम टाकून रस्ता वाहतुकी योग्य करण्याचे कार्य सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून तेलुक्यातील रस्‍यांसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते हे विशेष.

युद्ध पातळीवर काम चालू आहे
वरिष्ठांच्या आदेशाने पावसाळ्याच्या दृष्टीने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित कंत्राटदाराकडून काम करून घेणे सुरू आहे.
-संजय बोचे, उपअभियंता, तेल्हारा

जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आदेश
जिल्हा आढावा सभेत तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्ते येत्या 8 दिवसात अतितातडीने वाहतूक योग्य करण्यासाठी आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
-बच्चू कडू, पालकमंत्री अकोला जिल्हा

मुरुम टाकण्याचे आदेश दिले आहेत
मी, तेल्हारा तालुक्यातील मुख्य रत्याची पाहणी करीत तातडीने चिखलमय रत्यावर मुरुम टाकण्याचे आदेश दिले असून, काम प्रगती पथकावर सुरू आहे.
-प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट मतदारसंघ

loading image