Akola mayor election chaos
esakal
विदर्भ
Akola Mayor Election : एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे सभागृहात राडा! काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर वाद, नेमकं काय घडलं?
Akola Mayor Election Chaos : मतदानानंतर निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं तणाव निर्माण झाला.
अकोला : महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मतदानानंतर निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाला, तर काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
