मेडिकलला मिळणार पूर्णवेळ अधिष्ठाता?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्तमान अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही. घोरपडे हे 31 मार्च 2020 ला सेवा निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मेडिकला पूर्णवेळ कारभारी देण्याचा शासनाचा विचार असल्याने या पदासाठी डॉ.दीपक ठाकूर, अरुण हुमने, आर.पी.सिंग या तिघांची नावे सध्या चर्चेत असून वरिष्ठ स्तरावर यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्तमान अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही. घोरपडे हे 31 मार्च 2020 ला सेवा निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मेडिकला पूर्णवेळ कारभारी देण्याचा शासनाचा विचार असल्याने या पदासाठी डॉ.दीपक ठाकूर, अरुण हुमने, आर.पी.सिंग या तिघांची नावे सध्या चर्चेत असून वरिष्ठ स्तरावर यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी महाविद्यालयाला कायमस्वपरुपी अधिष्ठाता देण्याची मागणी अकोलेकरांमधून नेहमीच उपस्थित होत आली आहे. ही बाब लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडून येथील जीएमसीला कायस्वरुपी कारभारी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच्या हालचाली वरिष्ठ स्तरावर युद्धपातळीवर होत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ.दीपक ठाकूर, चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समाजिक औषधीशास्र विभागाचे प्रमुख डॉ.अरुण हुमने तर नागपूर मेडिकल कॉलेजच्या त्वचारोग विभागाचे प्रमुख आर.पी.सिंग या तिघांच्या नावांची चर्चा डीन पदासाठी वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे समजते. येत्या आठवडाभरात तातडीने शासनाकडून तसा आदेशही जारी होऊ शकते.

डॉ.ठाकूरांच्या नावावर शिक्कामोर्तब?
येथील जीएमसीच्या पीएसएम विभागात पूर्वी कार्यरत असणारे डॉ.अरुण हुमने यांची अंतर्गत तक्रारीमूळे चंद्रपूर येथे बदली झाली होती. त्यापाठोपाठ आर.पी.सिंग यांचेही नाव चर्चेत असले तरी सोलापूरच्या डॉ.दीपक ठाकूर यांच्या नावावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अंतिम शिक्कामोर्तब केल्या जाऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.

-तर डॉ.पावडेही दावेदार
शासनाला जीएमसीला कायमस्वपरुपी डीन द्यायचा नसल्यास या पदाचा प्रभार सेवा ज्येष्ठतेनूसार दिल्या जाऊ शकते. त्यानूसार कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व पावडे यांची प्रोफाईल बघता त्यांच्याकडे हा प्रभार दिल्या जाऊ शकते. तसेच वर्तमान अधिष्ठात डॉ.शिवहरी घोरपडे यांच्याकडूनही पावडे यांच्या नावाला पसंती असल्याचे समजते. त्यामूळे डॉ.पावडेंच्या नावाची संचालक डॉ.तात्याराव लहाणे यांच्याकडे शिफारस होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola medical college will get full time officer