esakal | निजामुद्दीनहून परतलेल्यांचा अहवाल बघा काय आला!
sakal

बोलून बातमी शोधा

akola Medical report of 4 of those 'returning' from Nizamuddin is 'negative'

दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या वाडेगाव येथील १८ संधिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी (ता.३) निगेटीव्ह आले. तर उर्वरीत ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

निजामुद्दीनहून परतलेल्यांचा अहवाल बघा काय आला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या वाडेगाव येथील १८ संधिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी (ता.३) निगेटीव्ह आले. तर उर्वरीत ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशीरा येथील १८ जणांना कोरोनाचे संधिग्ध रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. हे १८ जण दिल्ली येथील एका धामिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. परंतु, ते २ मार्च रोजीच अकोल्यात परतल्याचेही सांगण्यात येत होते.

दरम्यान मंगळवार ३१ मार्च रोजी कोरोनाचे संधिग्ध म्हणून स्थानिक आरोग्य विभागाने या १८ जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे समोर आहे. तर उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

या सर्वांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय, इतरही रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्यांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आले नाहीत.

समुपदेशनानंतर दोघांना केले दाखल!
दिल्ली येथे नोकरी निमित्त गेलेल्या अकोल्यातील दिोघांना शुक्रवारी प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात आणले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल होण्यास सांगितले. परंतु, यावेळी दोन्ही कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांना दाखल होण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही होता. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर त्या दोघांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. हे दोन्ही संधिग्ध रुग्ण १५ दिवसांपूर्वीच अकोल्यात परत आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

loading image