ऐकावेते नवलंच: महिलांनंतर आता पुरुषही होतायेत बेपत्ता !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

अकोल्यात बेपत्ता मुलीचे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता मुली बेपत्ता होण्याबरोबरच पुरुष बेपत्ता होण्याचे प्रकरण समोर येत आहे. कारण, एकाच आठवड्यात शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गंत दाखल झालेल्या तक्रारीत एकाच आठवड्यात आठ पुरुष बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अकोला : अकोल्यात बेपत्ता मुलीचे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता मुली बेपत्ता होण्याबरोबरच पुरुष बेपत्ता होण्याचे प्रकरण समोर येत आहे. कारण, एकाच आठवड्यात शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गंत दाखल झालेल्या तक्रारीत एकाच आठवड्यात आठ पुरुष बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अकोला शहरातून प्रत्येक दिवशी एक नागरिक बेपत्ता होत असून, रामदासपेठ पोलिस ठाण्यात एकाच आठवड्यात 8 नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असल्याचे जानेवारी दरम्यान निदर्शनास आले. या 8 नागरिकांमध्ये 4 युवतींचा समावेश असून, एक वायोवृद्धासह तीन तरुणांचा समावेश असल्याचे नमुद आहे. असा प्रश्‍न तारांकित प्रश्न अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (ता.5) उपस्थित केला. तसेच बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली किंवा करण्यात येणार आहे. तसेच 8 पैकी किती नागरिकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे असा प्रश्‍न उपस्थित करून गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.
यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, अकोला शहरातील 8 पोलिस स्टेशन अंतर्गत जानेवारीमध्ये 13 पुरुष बेपत्ता झाले होते. त्यापैकी 5 पुरुष मिळून आलेले आहेत. तसेच 9 महिला बेपत्ता आहेत त्यापैकी 5 महिला मिळून आल्या आहेत. तसेच रामदास पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत जानेवारीमध्ये 1 पुरुष व 1 महिला या प्रमाणे दोन इसम बेपत्ता आहेत. त्यापैकी महिला पिळून आली आहे. पोलिस स्टेशनला बेपत्ता इसमांबाबत मिसिंग दाखल करून स्थानिक पोलिसांमार्फत शोध घेण्यात येतो व शोध पत्रिका जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला स्थानिक गुन्हे शाखा अकोला मार्फत पाठविण्यात आल्या आहेत. तसेच बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन या सारख्या ठिकाणी लोकांचे निदर्शनास येईल अशा ठिकाणी शोध पत्रिका चिटकविण्यात आल्या असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola men are missing