esakal | coronavirus: आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुढे ढकलली
sakal

बोलून बातमी शोधा

akola mla cup Kabaddi competition postponed

कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील विविध कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात येत असून, दरम्यान, केळीवेळी येथे 27, 28 व 29 मार्च रोजी आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

coronavirus: आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुढे ढकलली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील विविध कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात येत असून, दरम्यान, केळीवेळी येथे 27, 28 व 29 मार्च रोजी आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या सर्वच मोठ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कबड्डी स्पर्धेदरम्यान होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून ती पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या. स्पर्धेसाठी अनेक दिग्गज येणार होते. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, क्रीडा मंत्री सुनिल केदार व जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आदींचा समावेश होता. यंदा विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावे आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांना ही स्पर्धा पुढे ढकलण्याचे आवाहन केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येणार आहे. 

loading image