Akola Municipal Corporation Results 2026
esakal
Akola Municipal Corporation election results 2026 declared : अकोला महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला १० जागांचा फटका बसला असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. त्याचेवळी काँग्रेसच्या १० जागा वाढल्या आहेत. ही पक्षासाठी दिलासादायक बाब आहे. यंदा भाजपने ३८ जागा जिंकल्या असून काँग्रेसने २१ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय वंचित आघाडीने ५ तर एमआयएमनेही ३ जागांवर विजय मिळाला आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या अकोला मनपात आता भाजपाचं सरकार येईल, हे जवळपास निश्चित आहे.