Akola Mayor Election Latest Update

Akola Mayor Election Latest Update

esakal

अकोलाचा महापौर ठरला! भाजपच्या शारदा खेडकर ४५ नगरसेवकांच्या पाठिंब्यानं विजयी, AIMIM तटस्थ राहिल्यानं चर्चांना उधाण!

Akola Mayor Election Latest Update : महापौर पदच्या निवडणुकीत काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलेला ‘चमत्काराचा दावा’ अखेर फोल ठरला आहे. एमआयएमच्या तीन सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. यावेळी राडा झाल्याचंही बघायला मिळालं.
Published on

श्रीकांत राऊत

अकोला : महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून, भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौर पदी अमोल गोगे विजयी झाले. विशेष सभेत झालेल्या मतदानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ विरुद्ध ३२ मतांनी पराभव करत शारदा खेडकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालासह भाजपने मित्रपक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता कायम राखली असून, काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलेला ‘चमत्काराचा दावा’ अखेर फोल ठरला आहे. एमआयएमच्या तीन सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com