

Eknath Shinde
sakal
श्रीकांत राऊत
अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे मंत्री व अकोला जिल्हा समन्वयक संजय राठोड आज अकोला दौऱ्यावर येत असून युतीतील तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. युती टिकणार की तुटणार, याचे संकेत आजच्या घडामोडींमधून स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.