अकोला : मामाने केला भाच्याचा खून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Murtijapur crime news

अकोला : मामाने केला भाच्याचा खून...

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुरूम येथील मेघराज राठी यांच्या वाडीतील प्लॉटमध्ये लहान बाळाला उचलून आपटल्याची, बाब मामाच्या जिव्हारी लागल्याने त्याने २५ वर्षीय भाचाला छातीत चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली.

कुरूम येथे मेघराज राठी यांच्या वाडीत शासनाने प्लॉट पाडून वस्ती निर्माण केली. येथे शेख फारुख शेख अहेमद (वय २५) हा त्याच्या सासऱ्याच्या घरातील एका खोलीत पत्नी व दोन मुलासह वास्तव्यास होता. लगतच्या खोलीत शेख फारुखचा मामा सैय्यद वारीस सैय्यद अहेमद (वय २६) हा सुद्धा तेवढ्याच राहत होता. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सैय्यद वारीस याच्या लहान बाळाला सैय्यद फारुख याने उचलून आपटल्याने वाद निर्माण झाला. या दरम्यान दोघांनीही घरातून चाकू आणून एकमेकांना मारहाण करणे सुरू केले.

या भानगडीत सैय्यद वारीस याचा मांडली चाकूच्या जखमा झाल्या, तर सैय्यद फारुखच्या छातीत चाकूचा जबर मार लागल्याने तो घटनास्थळी रक्तबंबाळ होऊन पडला. आरडाओरडा झाल्याने शेजारी धावून आले व सैय्यद फारुख याला कुरूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, असता सैय्यद फारुखची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वार अमरावती येथे रवाना केले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराअंती सैय्यय फारुखचा मृत्यू झाला.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत यांनी भेट दिली. पुढील तपास ठाणेदार राहुल देवकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक घनश्याम पाटील, सहाउपनिरीक्षक दिलीप नागोलकर, तेजराव तायडे, नंदकिशोर टिकार, नीलेश इंगळे, राजेश डोंगरे, पंकज वाघमारे, मनोहर इंगळे करत आहेत. आरोपी सैय्यद वारीस याला पोलिसांनी अटक केली, असून वृत्त लिहेपर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Akola Murtijapur Crime News Uncle Killed Nephew Accused Arrested By Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..