Akola News : मनपा शाळेच्या बडतर्फ मुख्याध्यापकाने परस्पर काढली रक्कम; गुन्हा दाखल

crime News
crime News

अकोला : महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमधील बडतर्फ मुख्याध्यापक नरेश बाबुलाल मूर्ती यांनी समग्र शिक्षा अंतर्गत शासनाव्दारा प्राप्त अनुदानाची रक्कम कॅनरा बँक खात्यातून काढली. याबाबत मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बडतर्फे मुख्याध्यापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime News
State Police : राज्य पोलीस दलात 639 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंबईतील 113 अधिकारी

अकोला महानगरपालिका अधिनस्त मराठी मु.शा.क्र. १ मधील प्रभारी मुख्याध्यापक नरेश बाबुलाल मूर्ती व सहाय्यक शिक्षक शरद पांडुरंग ताले हे दोन्ही कर्मचारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. असे असतानाही शाळेच्या आर्थिक व्यव्हाराकरिता असलेल्या कॅनरा बँक खात्यामधून शासनाच्या प्राप्त निधी अंतर्गत जमा असलेल्या रक्कमेमधून रुपये ४१ हजार ता. २० ऑक्टोबर २०२२ रोजी काढल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे याबाबत नरेश मूर्ती यांना विचारणा करण्यात आली होती. संपूर्णतः शहानिशा करून अपहाराकरिता जबाबदारी निश्चीत करण्यांसाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. पाचवेळा घेण्यात आलेल्या सुनावणीला संबंधित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर साक्षीदार कर्मचारी यांचेसह नरेश मूर्ती यांना सुध्दा वेळोवेळी नियमानुसार सुनावणी वेळी उपस्थित राहणे बाबत कळविण्यात आले होते.

तथापि, त्यांनी त्यांचे प्रशासनास सादर केलेल्या स्पष्टीकरणांमध्ये ‘शासनाचा निधी वाचविण्यासाठी मी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यांस तयार आहे’, असे नमुद केलेले असताना सुध्दा त्यांनी सदर सुनावणी वेळी अनुपस्थित राहुन प्रशासनास आवश्यक सहकार्य केलेले नाही.

crime News
Monsoon Update : विदर्भात दाखल झाले मॉन्सून; पुढील चार दिवसात राज्याच्या आणखी भागांमध्ये करणार प्रवेश

शाळा व्यवस्थापन अंतर्गत असलेले सर्व शासकीय दस्तऐवज व आर्थिक व्यवहाराशी निगडित बाबी हाताळणे या बाबत संपूर्णतः जबाबदारी सदर शाळेच्या मुख्याध्यापक यांची असल्याने तसेच मुख्याध्यापक हे शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव सुध्दा असल्याने सदर अपहाराकरिता नरेश बाबुलाल मूर्ती हे व्यक्तीशः जबाबदार असल्याचे सिध्द झाले आहे.

त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलिस तक्रार करण्यात आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी नरेश बाबुलाल मूर्ती यांच्या विरुद्ध फसणवूक केल्या प्रकरणी भादंवि ४२० व ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीची साक्ष ठरली महत्त्वाची

मनपा आयुक्तांकडे घेण्यात आलेल्या सुनावणी वेळी उपस्थित साक्षीदार रेखा अनिल बोदडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) या ता. २६ एप्रिल २०२३ रोजीच्या सुनावणीस हजर होत्या. त्यांनी सुनावणी दरम्यान नरेश मूर्ती यांचेकडे कोऱ्या धनादेशावर सही करून दिल्याचे सांगितले. त्याबाबतची नोंद कार्यालयीन टिप्पणीवर घेण्यात आली आहे. त्यांनी त्यांचे लेखी स्पष्टीकरण सुध्दा सादर केले आहे.

प्रशासनाने सदर शाळेचा पदभार विनायक मानकर यांना ता. २२ नोव्हेबर २०२२ रोजी शाळेचे कुलुप तोडून पंचनामा करून आहे त्या स्थितीत देण्यात आला होता. यावेळी शाळेचे संबधित कोणतेही आर्थिक दस्ताऐवज व चेकबुक इत्यादी दस्ताऐवज आढळून न आल्याचे संबधित साक्षीदार यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com