esakal | अकोल्यात कोरोनाचा शिरकाव, पहिला पॉझिटीव्ह आढळला

बोलून बातमी शोधा

akola news first corona positive

अकोला जिल्ह्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.७) दिली आहे. तेव्हा ही अकोलेकारांसाठी धोक्याची घंटा असून, पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकर धास्तावले आहेत. 

अकोल्यात कोरोनाचा शिरकाव, पहिला पॉझिटीव्ह आढळला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला जिल्ह्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.७) दिली आहे. तेव्हा ही अकोलेकारांसाठी धोक्याची घंटा असून, पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकर धास्तावले आहेत. 

अकोल्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मागील काही दिवसांपासून आढळला नव्हता. मात्र, दिवसागणिक संशयित रुग्णांची संख्या वाढतच होती. अशातच मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल येण्यास विलंब लागत होता. सर्वोपचार रुग्णालयातील ६० रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. अशातच मंगळवारी धोक्याची घंटा वाजली असून, अकोल्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेव्हा आता तरी अकोलेकर घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात आहे. या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि तो कोठे गेला होता याबाबत माहिती मिळाली नाही.

कोरोनामुळे बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर वाशीम जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्ण सापडला आहे. दिवसेंदिवस या तिन्ही जिल्ह्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. मात्र, मंगळवार (ता.7) सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालानुसार  जिल्ह्यात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडला असल्याने अकोलेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत वऱ्हाडात बुलडाणा, वाशीम आणि अमरावती येथे कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना बाधीत नव्हता. दरम्यान मंगळवार (ता.7) संध्याकाळी पाच वाजता एका रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण आहे.