esakal | शेगावात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला, जुगार, वरली-मटका आणि अवैध दारूची वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Illegal trade, gambling, worli-matka and illicit liquor smuggling increased in Shegaon

शेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून उदयास तर आलेच आहे. सोबतच आता अनलॉकमध्ये हा तालुका गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, कोरोना पाठोपाठ आता शेगावात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला असल्याचे दिसून येत आहे.

शेगावात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला, जुगार, वरली-मटका आणि अवैध दारूची वाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

शेगाव (जि.बुलडाणा)   ः शेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून उदयास तर आलेच आहे. सोबतच आता अनलॉकमध्ये हा तालुका गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, कोरोना पाठोपाठ आता शेगावात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला असल्याचे दिसून येत आहे.


शेगावातील शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमएससीबी, आठवडी बाजार, सरकारी फैल, श्री टॉकीज परीसर, जुने बसस्थानक या ठिकाणी जुगार आणि अवैध खेळल्या जात आहे. तर हा प्रकार सुरू असूनसुद्धा पोलिस प्रशासन मात्र लॉकडाउनचा नियम केवळ फळभाजी विक्रेते, चहा विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनच पालन करून घेत असल्याचे चित्र सध्या शेगाव शहरात दिसून येत आहे. विशेष म्हणजे एकीकडे कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असलेल्या शेगाव शहर आणि ग्रामीण अवैध धंदे कमी होण्या ऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

भर बाजारात खेळल्या जातो जुगार
शेगाव शहरातील मुख्य भाजी बाजारात भर दिवसा आणि रात्री अपरात्री जुगार, अवैध दारू विक्री केली जात आहे. याठिकाणी कारवाई होताना दिसत नाही. तर लॉकडाउनच्या वेळेनंतरही शहरात दारू विक्री होत असून, अवैध दारू विक्रेते चढ्या भावाने दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती आहे.
 

(संपादन - विवेक मेतकर)