esakal | अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी द्यावा लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुध्द सुरू आहे काम
sakal

बोलून बातमी शोधा

Stamps to be given to farmers for crop loans, work is going on against the government order

खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने आदेश काढून बँकांना सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात शासन आदेशाविरुद्ध काम सुरू असून, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे स्टॅम्पची मागणी केली जात  आहे.

अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी द्यावा लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुध्द सुरू आहे काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने आदेश काढून बँकांना सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात शासन आदेशाविरुद्ध काम सुरू असून, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे स्टॅम्पची मागणी केली जात असल्याने त्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी आक्षेप घेतल आहे.

पावसाळा तोंडावर आहे. शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे मिळणे आवश्यक आहे. बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही आणि पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात शासन आदेशाच्या विरोधात काम होत असल्याचा आरोप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेमध्ये स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे सर्वंच बंद आहे. स्टॅम्प पेपर उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते द्यावे कुठून. ही पद्धत चुकीची असून, शासन आदेशानुसार काम न करता अकोल्यात त्याविरुद्ध काम सुरू आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही आमदारांनी केली.

बँका व कृषी विभागात हवा समन्वय
पीक कर्जासाठी स्टॅम्प पेपरची मागणी होत असताना त्याचा काळाबाजार सुरू आहे. स्टॅम्प पेपर सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रआस सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी तालुका निहाय प्रशासन, कृषी विभाग व बॅंका यांची समन्वय समिती गठीत करण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली.