जुळ्या बहिणींचे मार्क ‘सेम टू सेम’

प्रवीण खेते 
गुरुवार, 31 मे 2018

अकोला - निसर्गाची किमया म्हणून दोन बहिणी जुळ्या जन्मल्या. पण, नवल झालं ते जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळल्याचं. ऐकल्यावर आश्‍चर्य वाटेलच, मात्र हे सत्य आहे. ही किमया आहे राधादेवी गोयंका महाविद्यालयातील सई आणि जुई पेठे या बहिणींची. 

अकोल्यातील गौरक्षण रोड स्थित माधवनगर येथील रहिवासी चंद्रशेखर पेठे यांना सई आणि जुई नावाच्या दोन जुळ्या मुली. त्या यंदा राधादेवी गोयंका महाविद्यालयात इयत्ता बारावीला कला शाखेत होत्या. जन्माने जुळ्या या बहिणी लहानपणापासूनच थोड्या हटके स्वभावाच्या. काहीपण करायचं, तर सोबत करायचं, मग अभ्यासात मागे का? अभ्यासही सोबतच करायचा अन्‌ मार्कही सारखेच मिळवायचे. असंच काहीसं  गणित बारावीला असताना केलं. परीक्षेची तारीख जवळ आली, तशी दोघींनी अभ्यासाला जोमाने सुरुवात केली. दोघींच्याही अभ्यासाच्या वेळा सारख्याच. त्यांच्या या परिश्रमाचं फलित बुधवारी बारावीचा निकालातून झालं ते दोघींप्रमाणे जुळ्या गुणांनी. सई आणि जुई या दोघींना ८४.९२ टक्के गुण मिळाले. आई-वडिलांसोबतच कॉलेजातल्या शिक्षकांनाही हा आश्‍चर्याचाच धक्का होता.

Web Title: akola news twin sisters mark same to same in HSC result