पंचायत समित्यांवर भारिप बहुजन महासंघाचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जिल्ह्यातील विविध पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणूकीतभारिप बहुजन महासंघाने वर्चस्व सिध्द केले आहे. 

अकोला : जिल्ह्यातील विविध पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणूकीतभारिप बहुजन महासंघाने वर्चस्व सिध्द केले आहे. 
अकोला पंचायत समिती सभापतीपदी वसंतराव नागे तर उपसभापतीपदी रिता ढवळी यांनी विजय मिळविला तर बाळापूर पंचायत समिती सभापतीपदी रुपाली मंगेश गवई, तर उपसभापतीपदी धनंजय दांदळे यांनी विजय मिळविला. अकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी लता शत्रुघ्न नितोने तर उपसभापतीपदी निलेश झाडे यांनी विजय मिळविला. तेल्हारा पंचायत समिती सभापतीपदी रफत सुलताना यांनी विजय मिळविला. बार्शीटाकळी पंचायत समिती सभापतीपदी प्रकाश वाहुरवाघ यांनी विजय मिळवित अकोला जिल्ह्यातील पंचायत समितींवर भारिप बहूजन महासंघाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 
यावेळी प्रतिभा अवचार, डॉ प्रसन्नजीत गवई, दामोदर जगताप, सुरेश शिरसाट, डॉ धैर्यवर्धन पुंडकर, समाधान सावदेकर, शोभा शेळके, सैफुल्ला खान, प्रभाताई शिरसाट, दिपक गवई, बळिराम चिकटे, वासुदेव टिकार, प्रमोद देंडवे, सचिन शिराळे या निरिक्षका सोबतच ज्ञानेश्वर सुलताने, दिनकर खंडारे, विलास गवई, गजानन लांडे, विक्रम जाधव, संदिप आंग्रे, संदिप ईंगळे, विनोद नागे, राजु बोरकर, दिलिप मोहोड,विकास पवार, सुरेंद्र तेलगोटॆ, विकास सदाशिव, प्रधान गुरुजी, दिपक सावंग, आतिश शिरसाट, शेख गणी, राजुमिया देशमुख, प्रदिप पळसपगार, किशोर जामनिक, बंडु खंदारे, अमोल शिरसाट, योगेश किर्दक, एकनाथ शिरसाट, माणिक टोबरे, प्रभु जंजाळ, मनकर्ना शिरसाट यांच्यासह सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola panchayat samity chair person elected by vanchit bharip