esakal | पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले 13 जण

बोलून बातमी शोधा

akola the positive patient came in contact with 13 people

एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधीत झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे स्पष्ट होताच या रुग्णाच्या संपर्कात अकोला जिल्ह्यातील पातूर व खेट्री येथील १३ जण आल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच त्या सर्व जणांशी संपर्क करुन सायंकाळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी हे दोन्ही गावे गाठून सर्व १३ जणांच्या कुटूंबियांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले 13 जण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : वाशीम जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधीत झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे स्पष्ट होताच या रुग्णाच्या संपर्कात अकोला जिल्ह्यातील पातूर व खेट्री येथील १३ जण आल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच त्या सर्व जणांशी संपर्क करुन सायंकाळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी हे दोन्ही गावे गाठून सर्व १३ जणांच्या कुटूंबियांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. हे सर्व जण अमरावती येथे परस्परांच्या संपर्कात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील कोरोनाचा बाधित रुग्ण हा दिल्ली येथील निजामुद्दीन येथे धार्मीक कार्यक्रमातून परतला होता. शुक्रवारी त्याचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तो त्याच्या मुळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील १२ ते १५ लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. यातील १३ जणांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला आहे.

या संर्वांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात रात्री उशिरा दाखल करण्यात आले. त्यांचे 'स्वॅब' शनिवारी सकाळीच नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकार अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेण्याची आवश्यकता असून, प्रत्येक क्षणाला सतर्क रहावे. शासन, प्रशासन स्तरावरून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.