esakal | जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी; विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

akola Presence of torrential rains in the district; Signs of rain across the state including Vidarbha

अकोल्यासह पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशातही वातावरण बदलासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शिवाय पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी; विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : हवामान विभागाने विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत दिले असून, रविवारी (ता.१०) अकोल्यात वादळी पावसाने हजेरी लावली. तापमानातील चढ-उतार व वातावरण बदलाचा हा परिणाम असला तरी, हा बदल सर्वत्र असल्याने याला पूर्व मॉन्सूनची सुरुवात सुध्दा म्हणता येईल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एरव्ही मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात वळीवाचा (मॉन्सून पूर्व) पाऊस हजेरी लावायचा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमण व्हायचे. परंतु गेल्या काही वर्षात ऋतुचक्रच बदलले आणि पूर्व मॉन्सून, मॉन्सूनची सुरुवात लांबत गेली. गेल्या वर्षी तर, पूर्व मॉन्सूनने हजेरीच लावली नाही आणि मॉन्सूनचे आगमन सुद्धा जुलैमध्ये झाले. यावर्षी मात्र मॉन्सून सामान्य राहणार असून, मॉन्सूनचे आगमन सुद्धा योग्यवेळी होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार वातावरणात बदल सुद्धा दिसून येत असून, ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले तापमान रविवारी अचानक ४२ अंशावर घसरले. १० ते १५ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांपर्यंत आर्द्रता वाढली आणि जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली.

अकोल्यासह पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशातही वातावरण बदलासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शिवाय पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

तापमान व आर्द्रतेमधील बदलामुळे ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असून, याला पूर्व मॉन्सूनची सुरुवात सुद्धा म्हणता येईल. वातावरण बदलानुसार अकोला, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, भंडारा, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यातील काही भाग व महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमा लगत भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर