सात हजारावर प्रवाशांनी ओलांडली ‘डेडलाईन’

akola seven thousand crosses 'deadline'
akola seven thousand crosses 'deadline'

अकोला  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययाेजना करण्यात येत असून बाहेर गावावरुन जिल्ह्यात १९ हजार २९६ प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी सात हजार २८५ प्रवाशांनी कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्‍यक असलेला १४ दिवसांचा अलगीकरणाचा (क्वारंटाईन) कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे असे प्रवाशी सध्यातरी धोक्याबाहेर असल्यामुळे आरोग्य विभागाला थोडा दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते, परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले, त्या ठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत जिल्ह्यातील शनिवार (ता. ४) पर्यंत परतलेल्या १९ हजार २९६ प्रवाशांपैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. संबंधितांपैकी काही नागरिकांना पुढीत तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर सुद्धा करण्यात आले आहे. परंतु सात हजार २८५ नागरिकांनी अलगीकरणाचा कालावधी (क्वारंटाईन) पूर्ण केला आहे.

संशयामुळे २२० प्रवाशी केले संदर्भीत
कोरोना विषाणूच्या संसर्गासह आरोग्याच्या इतर कारणांमुळे संशयीत आढळलेल्या २२० प्रवाशांना शनिवारपर्यंत (ता. ४) तपासणीनंतर सर्वोपचार रुग्णालयात संदर्भीत सुद्धा करण्यात आले आहे.

असे आहेत अलगीकरण पूर्ण झालेले प्रवाशी
अकोला तालुक्यातील २ हजार १०, मूर्तिजापूर ९०१, बार्शीटाकळी १ हजार ३८५, पातूर १ हजार २०३, बाळापूर ८६९, तेल्हारा ५५८, अकोट ३५९ अशा एकूण सात हजार २८५ प्रवाशांनी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com