esakal | 'ते' परतले स्वगृही अन् उद्योग साखळी झाली खिळखिळी!
sakal

बोलून बातमी शोधा

akola 'They' returned home and the industry became chained!

मजूर/ कामगार आणि कच्च्या मालाच्या अभावाने आधिच जिल्ह्यातील 60 ते 70 टक्के उद्योग बंद पडून होते. आता तर जिल्ह्यातून हजारो परप्रांतीय मजूर सुद्धा त्यांच्या राज्यात परतल्यामुळे संपूर्ण उद्योग साखळीच खिळखिळी झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे कृषी आधारित उद्योग सुरू ठेवणे सुद्धा उद्योजकांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

'ते' परतले स्वगृही अन् उद्योग साखळी झाली खिळखिळी!

sakal_logo
By
अनुप ताले


अकोला : मजूर/ कामगार आणि कच्च्या मालाच्या अभावाने आधिच जिल्ह्यातील 60 ते 70 टक्के उद्योग बंद पडून होते. आता तर जिल्ह्यातून हजारो परप्रांतीय मजूर सुद्धा त्यांच्या राज्यात परतल्यामुळे संपूर्ण उद्योग साखळीच खिळखिळी झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे कृषी आधारित उद्योग सुरू ठेवणे सुद्धा उद्योजकांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष श्रमिक रेल्वेचे नियोजन केले. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरून पश्चिम विदर्भातील कामगारांना घेवून जाणारी पहिली रेल्वे 4 मे रोजी उत्तरप्रदेशला रवाना झाली होती. त्या गाडीने 1192 प्रवाशी पाठविण्यात आले होते. त्यानंतर 8 मे रोजी मध्यप्रदेशातील 1300 कामगारांना श्रमिक रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले आणि 9 मे रोजी अमरावती विभागातून उत्तर प्रदेशसाठी रवाना झालेल्या दुसऱ्या श्रमिक रेल्वेने अकोला जिल्ह्यातील 440 कामगार त्यांच्या गावी परतले. अशाप्रकारे जवळपास तीन हजार परप्रांतीय कामगार आतापर्यंत अकोला जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात परत गेले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परप्रांतीय कामगार वर्गासाठी ही दिलासा जनक बाब असली तरी, जिल्ह्यातील उद्योगावर मात्र यामुळे मोठा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे दीड ते दोन हजार लघू, मध्यम व मोठे उद्योग असून, लॉकडाउनमध्ये त्यांच्यापैकी केवळ जीवनावश्यक उत्पादन निर्मिती करणारे मोजकेच उद्योग सुरू होते. होळीसाठी अकोल्यातून स्वगृही गेलेले जवळपास साठ टक्के परप्रांतीय मजूर/ कामगार लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात परतु शकले नाहीत. त्यामुळे केवळ 30 ते 40 टक्के मजुरांच्या भरोशावर ही उद्योग साखळी सुरु होती. परंतु, आता त्यापैकी तीन ते साडेतीन हजार परप्रांतीय कामगार परराज्यात परत गेल्याने ही उद्योग साखळी पूर्णपणे खिळखिळी झाली असून, त्याचा जिल्ह्यातील उद्योगावर व पर्यायाने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊ शकतो परिणाम
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी आधारित उद्योग सुरू ठेवण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात अडीचशे ते तीनशे कृषी आधारित उद्योग सुरू होते. त्यामध्ये तीन ते साडेतीन हजार कामगार काम करत होते. परंतु गेल्या दोन आठवड्यात तीन हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परतल्यामुळे या कृषी आधारित उद्योगांना मोठा फटका बसला असून, त्याचा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो.