esakal | आंबेडकर जिंकले, धोत्रे हरले!
sakal

बोलून बातमी शोधा

ambedkar dhotre

शिवसेनेची साथ सुटल्याने अकोल्यात मतविभाजनाचा मोठा फटका भाजपला

आंबेडकर जिंकले, धोत्रे हरले!

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राजकीय डावपेचापुढे वंचित बहुजन आघाडी अर्थात भारिप बहूजन महासंघ जिल्ह्यातील कायमचा संपला अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेना दूर गेल्याने झालेल्या मतविभाजनाचा फटका अकोला जिल्ह्यात भाजपला बसला. यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना मोठा फटका बसला तर वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग अद्यापही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जाऊ शकतो हे दाखवून राजकीय डावपेचात विजय मिळविला आहे.


गेली २० वर्षे सतत जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवित ठेवताना सातत्त्याने ॲड. आंबेडकर यांच्या पक्षावर ग्रामीण भागाच्या विकासाला खिळ बसविल्याचा आरोप होत आला. सत्तेच्या राजकारणात जिल्ह्यातील गोरगरिबांच्या योजनाही राबविता न आसलेल्या भारिप-बमसंला रोखण्याचे आव्हान चार आमदारांच्या बळावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी स्वीकारले होते. त्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. मात्र शिवसेनेची सोबत सुटल्यानंतर ग्रामीण भागातील मतविभाजन टाळण्यच्या आव्हान त्यांना पेलविले नाही. यालट केंद्र व राज्यात एकही खासदार, आमदार नसतानाही केवळ जातकीय समिकरणे जुळवून आणत जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सर्वांत मोठा पक्ष होण्याची किमया वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंने अकोला जिल्ह्यात करून दाखविला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता स्थापन करताना आता समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे आव्हान वंचितच्या नेत्यांपुढे राहील.


मूळ गावात पराभव, दत्तकगावात विजयी
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे मूळ गाव पळसोबढे आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी दत्तक घेतलेले गाव केळीवेळी. त्यांच्या मूळ गावाच्या मतदारसंघात पंयायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी केळीवेळी या दत्तक गावात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. जन्माने नव्हे तर कर्माने माणूस मोठा होते, हे यातून सिद्ध होत असल्याची चर्चा आहे. आमदार रणधीर सावरकर यांचेही पळसाे बडे गाव कुरणखेड या सर्कलमध्ये येत असून, याठिकाणी विजयी झालेल्या भारिप-बमंसच्या उमेदवाराला ५ हजार ३९६ मतं मिळाली. भाजपच्या उमेदवाराला ३ हजार ३४७ मतं मिळाली. या सर्कलमधील दाेन पंचायत समितीमध्येही भारिप-बमंसने बाजी मारली आहे.


यामुळे भाजपचा पराभव
- जिल्ह्यात जातीय समिकरण विपरित
- शिवसेनेना स्वतंत्र लढल्याने मतविभाजन
- राज्यातील सत्ता गेल्याने भाजप ऐवजी शिवसेनेला मतदारांची पसंती
- शहरी पक्ष म्हणून असलेली ओळख पुसता आली नाही
- पक्षांतर्गत मतभेदाचा फटका
- जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देताना भाजपच्या कार्यकर्त्यांना डावल्याची भावना
- पार्सल उमेदवारांची मोठी संख्या
- कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गृहित धरणे पडले महागात 

loading image