NEET 2025 : अक्षद आचलेने "नीट" परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला; ५९७ गुणांसह जिंकला मुक्काम
NEET Result : देवरी येथील अक्षद आचलेने "नीट" परीक्षेत एस.टी. गटातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. अक्षदने जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात अनुक्रमे ३४६, १५४ आणि ९७ गुण मिळवले.
देवरी (जि. गोंदिया) : येथील रहिवासी असलेल्या अक्षद आचले याने नुकत्याच लागलेल्या ''नीट''च्या परीक्षेत एस.टी.गटातून राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. त्याला जीवशास्त्रात ३४६, रसायनशास्त्र १५४ आणि भौतिकशास्त्रात ९७ असे एकूण ५९७ गुण मिळाले आहे.