Akshay Nagalkar Murder Case
esakal
विदर्भ
Akola Crime News : अक्षय नागलकर हत्याकांडातील आणखी चार आरोपींना अटक; ‘एलसीबी’ची मोठी कारवाई...
Akshay Nagalkar Murder Case : या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या चौघा आरोपींना न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अकोला, ता. २६ : अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत रविवारी (ता.२६) आणखी चार आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या चौघा आरोपींना न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या नऊ झाली आहे. शिवा माळी हा आरोपी अद्याप फरार असून, तो लवकरच पोलिसांच्या गळाला लागेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
