अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर 

 The albino samber found in Navegaon
The albino samber found in Navegaon

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अर्जुनी-मोरगाव तालुक्‍यातील जंगलात झाडाआड दडलेले दुर्मिळ पांढरे सांबर आढळून आले. 2016 मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पात हे दुर्मिळ अल्बिनो सांबर दिसले होते. 

अनुवांशिक बदलामुळे सांबराचा मूळ रंग बदलून फिक्कट पांढरा होतो. परंतु, अशी प्रजाती अभावनेच आढळून येते. विदर्भातील समृद्ध जंगलांमध्ये पुन्हा एकदा हे सांबर आढळले आहे. 2017 साली गुजरातमधील गीर अभयारण्यात अल्बिनो सांबर आढल्याची नोंद आहे. तृणभक्षी असलेले हे हरीण जातीतील पांढरे सांबर वनरक्षक हितेंद्र अनारसे यांना राष्ट्रीय उद्यानात गस्त करीत असताना दिसले. 

यापूर्वी या प्रकल्पात न पाहिलेले पांढऱ्या रंगाचे जंगलात जमिनीवर गवतात बसलेले प्राणी दिसून आले. त्यामुळे ते आश्‍चर्यचकित झाले. गवतात बसलेले हे पांढरे सांबर ठळकपणे त्यांना दिसले. पांढऱ्या रंगाचा असणारा व कानाचा रंग हलका गुलाबी, पिंगट डोळे व तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा आहे, असे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या उपसंचालिका पूनम पाटे यांनी सांगितले. 

अल्बिनो प्राण्यात शरीरातील रंगद्रव्य कमी
अल्बेनिझम एक डिसआर्डर आहे. मॅलेनीन जो एक गडद रंगद्रव्य आहे, तो कोणत्याही प्राण्यात चामडीचा रंग ठरवितो. मॅंलोनोसाईट नावाची पेशी मॅलीनीनची मात्रा ठरवते. अल्बिनो प्राण्यात शरीरातील रंगद्रव्य कमी असते किंवा नसते. त्यामुळे कातड्याचा रंग पांढरा होतो. 2008 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही अल्बिनो सांबराचे दर्शन झाले होते. हे सांबर खूप पांढरे असून, त्यांचा रंग थोडा बदलण्याची शक्‍यताही आहे. याशिवाय काळ्या तोंडाच्या वानाराचा चेहराही पांढरा झालेले पाहिलेले आहे. अनेक प्राण्यांमध्ये अल्बिनो आढळतात. 
गिरीश वशिष्ट, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com