नियमांची ऐसीतैसी! कोरोना वॉर्डात मिळतो ५० रुपयांत खर्रा अन् ३००ला दारू, वाचा कुठे सुरू आहे हा प्रकार...

Alcohol is available in the Corona ward in Bhandara
Alcohol is available in the Corona ward in Bhandara

भंडारा : कोरोना विषाणूच्या काळात जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात लागला आहे. यासाठी अनेक खबरदारी घेतली जात आहे. मात्र, या कठीण काळातही आपला लाभ पाहणारे या जगात काही कमी नाही. या स्थितीतही काही लोक आपला ‘धंदा’ शोधूनच घेतात. असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर...

रुग्णांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह येताच त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचारासाठी आणले जाते. अशा रुग्णांना दहा दिवस येथे ठेवले जाते. या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार दिला जातो. मात्र, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतलेल्या लोकांचा अनुभव अतिशय वाईट आहे.

येथे रुग्णांना एका खोलीत डांबून ठेवले जाते. त्या खोलीच्या बाहेरील दाराला कुलूप लावले जात असल्याची माहिती डिस्चार्ज झालेल्या रुग्णाने दिली. डॉक्टर तपासणीसाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठी देखील येत नाहित, अशाही अनेकांच्या तक्रारी आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे कोरोना वॉर्डात उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खर्रा किंवा दारू हवी असेल तर काही कर्मचारी त्यांना केवळ ५० रुपयांत खर्रा आणि ३०० रुपयांमध्ये दारू आणून देतात, असा गंभीर आरोप या रुग्णाने केला आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या ५६८ झाली आहे. यापैकी ३४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २११ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा नऊवर गेला असल्याने सर्वत्र जिल्हा प्रशसनावर टीका होत आहे. असे असताना कोरोना वॉर्डात दारू आणि खर्रा मिळत आहे. त्यामुळे हा कसला उपचार, हा प्रश्न येथील जनता विचारत आहे.

रुग्णाने दिली माहिती

एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचारासाठी आणले जाते. त्याच्यावर इथे उपचार झाला. उगचारातून बरा झाल्यानंतर त्याला सुटी देण्यात आली. यानंतर त्याने इथे सुरू असलेला प्रकार सांगितला. आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ५० रुपयांत खर्रा आणि ३०० रुपयांत दारू उपलब्ध करून दिली जाते. येथे १० दिवस राहिलेल्या एका रुग्णाने येथे चालत असलेले प्रकार ‘सकाळ’ला सांगितला.

पैसे मोजा अन् व्यसन पूर्ण करा

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विभागात ५० रुपयांत खर्रा आणि ३०० रुपयांत दारू मिळते, हे ऐकून जेवढे आश्चर्य वाटते, तेवढेच हे धक्कादायक आहे. येथे दाखल केलेल्या रुग्णांना लागणाऱ्या सुविधा धड उपलब्ध नाहीत. व्यवस्थेमध्ये अनेक उणिवा आहेत. रुग्णांना येथे जेवण, चहा वेळेवर मिळो न मिळो, पण लोकांचे व्यसन पूर्ण करणाऱ्या वस्तू मात्र वेळेवर मिळतात. फक्त त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com