गुरुजींच्या वस्तीत पक्ष्यांची शाळा: भल्या पहाटे हजारो पक्ष्यांची हजेरी

all birds are coming togather in amravati gurujis home
all birds are coming togather in amravati gurujis home

मांजरखेड(जि. अमरावती) ः "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती', मंगेश पाडगावकरांच्या या काव्याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या यवतमाळमधील चांदुरेनगरातील शिक्षकांच्या वस्तीत भल्या पहाटे भरणाऱ्या पक्ष्यांच्या हजेरीहून आला.

हिवाळ्याची बोचरी थंडी आणि दीपावली सणाच्या आनंदोत्सवादरम्यान लालबुडी भिंगरी, मंदिर देवकन्हाई (मशीद अबालील) पक्ष्यांची शाळा बघून येथे येणाऱ्या पाहुण्यांचे सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

धामणगाव-यवतमाळ रस्त्यालगत मोहा फाटा नजीक चांदुरेनगर (शिक्षक कॉलोनी) आहे. सकाळी सूर्योदयादरम्यान वीजतारांवर सुमारे ५० ते ६० हजार एवढ्या संख्येत पक्ष्यांचा थवा असतो. सकाळी अंदाजे दोन तास पक्षांचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. अनेक पक्षिमित्र पक्षिनिरीक्षणासाठी दूरवर भ्रमंती करतात, पण घरबसल्या हे पक्षी पाहायला मिळत असल्याने स्थानिक रहिवाश्‍यांना सुखद अनुभव मिळत आहे. या परिसरात आजूबाजूला तीन पानस्थळ जागा आहेत. यामध्ये बोरगाव धरण, टाकळी तलाव, मोहा तलावाचा समावेश आहे. स्थानिक बोरगाव प्रकल्प येथे ८७ पक्षी, निळोना येथे ७२ पक्षी तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३४२ पक्ष्यांची नोंद पक्षिमित्रांनी पक्षी सप्ताहादरम्यान केली. यामध्ये अमेरिका, युरोप या खंडातील विविध प्रजातींचे १०४ पक्ष्यांमध्ये स्थानिक स्थलांतर करणारे ग्रेटर फ्लेमिंगो आणि विदेशी स्थलांतरित पक्षी ब्लॅक टेल गॉडवीट आदींचा समावेश आहे.

सुखद आनंदानुभव

हे पक्षी गेल्या आठ दिवसांपासून अगदी भल्यापहाटे येतात. उन्ह कोवळे असेपर्यंत थांबतात व नंतर अचानक दिसेनासे होतात. गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहे, परंतु भल्यापहाटे घराभोवती होणारा पक्ष्यांचा किलबिलाट हा अनुभव खरचं खूप सुखद आनंदानुभव आहे, असे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वरदचे (पं. स. राळेगाव) मुख्याध्यापक मिलिंद अंबलकर यांनी सांगितले.

पक्ष्यांची अचूक वेळ

देशविदेशातील विविध भागांतील पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात आपल्या इकडे येतात. सकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पक्षी गटागटाने परिसरात आठही दिशांना प्रस्थान करतात. त्यातील काही पाच किमी तर काही २०-२५ किलोपर्यंत उड्डाण भरतात. मग विविध दिशांना व विविध अंतरावर गेलेले पक्षी एकाच वेळेस व एकाच ठिकाणी कसे एकत्र येतात हा खरं तर आपल्या मानवांसाठी उत्स्कुतेचा व संशोधनाचा विषय असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com