नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वधर्मीयांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

मोताळा (जिल्हा बुलडाणा) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) याला देशभरातून विरोध होत आहे. राज्यघटनेची पायमल्ली करणारा हा कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने शुक्रवारी (ता.10) मोताळा तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सीएए, एनआरसीमुळे देशात अस्वस्थता निर्माण होत आहे. दरम्यान सामाजिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या मोर्चात सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 

हेही वाचा - पवार-आंबेडकर एकत्र आल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया! 

मोताळा येथील आठवडी बाजार चौकातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा मोताळा-नांदुरा मुख्य मार्ग, बसस्थानक चौक, बुलडाणा मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात तालुकाभरातील हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडला होता. तहसील कार्यालयानजीक पोहोचताच या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All religions protest against citizenship law