
अमरावती : आग लागलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झोकून देत सिलिंडर बाहेर काढून जय अंबा अपार्टमेंटच्या ७० कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करिना थापाच्या धाडसी वृत्तीची दखल घेऊन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात तिला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.