क्या बात है! अमरावती विद्यापीठाने बनवला 'सिल्व्हर नॅनो मास्क'; कोरोनापासून होणार बचाव 

Amaravati University made silver nano mask for protection against corona
Amaravati University made silver nano mask for protection against corona

अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने नॅनो टेक्‍नॉलॉजी विषयात केलेल्या संशोधनाची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या विभागातील डॉ. अनिकेत गादे व डॉ. होमिभाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई येथील डॉ. राजेश राऊत यांनी माजी विभागप्रमुख तथा यूजीसी बी.एस.आर. फेलो डॉ. महेंद्रकुमार रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्व्हर नॅनो मास्क तयार केला आहे. या मास्कमुळे कोरोना संसर्गापासून संरक्षण होणार असून त्याचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२६) करण्यात आले.

कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अधिसभा सदस्य डॉ. व्ही. एम. मेटकर, श्रीसंत गाडगेबाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. दिलीप काळे, रा.से.यो. प्रभारी संचालक डॉ. राजेश बुरंगे, रसायनशास्त्र विभागातील डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने तयार केलेला सिल्व्हर नॅनो मास्क वापरण्यास हलका व श्‍वास घेण्यासाठी ९९ टक्‍के सुलभ असून वारंवार धुऊन त्याचा पुनर्वापर करता येतो. 

त्वचेला साजेसा व व्यवस्थित फिटींगमध्ये बसणारा आहे. सिल्व्हर नॅनो पार्टिकल कडुनिंबाच्या एक्‍स्ट्रॅक्‍ट पासून तयार केला असून ट्रिपल लेअर मास्क अशी बांधणी आहे. बाहेरच्या लेअरला सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स कोटिंग आहे. मास्कमुळे कोरोनामुळे संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळणार आहे.

युरोपियन स्टॅण्डर्ड टाइप २ प्रकारचा हा मास्क आहे. या मास्कवरील सिल्व्हर नॅनो पार्टिकलमुळे सर्व जिवाणू व विषाणूचा नाश होणार आहे. शासकीय टेक्‍स्टाईल रिसर्च लेबॉरटरीने हा मास्क परीक्षण केला असून ९९.९ टक्‍के कार्यक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com