Ambadi Flowers Benefits
sakal
विदर्भ
Ambadi Flowers Benefits: अंबाडीची फुले महिलांच्या आरोग्यासाठी वरदान; मासिक पाळी ते वजन वाढीच्या समस्येवर उपयुक्त
Ayurveda Benefits: अंबाडीची फुले महिलांच्या मासिक पाळीतील त्रास, पोटदुखी, रक्तक्षय आणि वजन वाढ यावर नैसर्गिक उपाय ठरतात. अँटिऑक्सिडंट्स, आयर्न आणि फायबरमुळे हार्मोन संतुलन आणि पचन सुधारते.
नागपूर : मासिक पाळी म्हटली की महिलांना शारिरीक व मानसिक अशा दोन्ही स्तरावर त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता अंबाडीचे फुल हे महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. अनेक महिलांना मासिक पाळीतील अनियमितता, पोटदुखी, थकवा तसेच वाढते वजन यांसारख्या समस्या भेडसावत असतात.

