esakal | द बर्निंग रुग्णवाहिका : अमरावतीच्या पंचवटी चौकात घेतला पेट; चालकाने वाचवला रुग्णाचा जीव

बोलून बातमी शोधा

The ambulance caught fire Amravati crime news

रस्त्याच्या बाजूला रुग्णवाहिका उभी करून पाहणी केली असता रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे निदर्शनास आले. चालकाने क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिकेतील रुग्ण अमोल तट्टे याला बाहेर काढले. रुग्णाला बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेचा पुढील भाग जळून खाक झाला.

द बर्निंग रुग्णवाहिका : अमरावतीच्या पंचवटी चौकात घेतला पेट; चालकाने वाचवला रुग्णाचा जीव
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : लेहगाववरून अमरावतीला रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने पेट घेतला. सोमवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास पंचवटी चौकात ही घटना घडली. यावेळी वाहनात चालकासोबतच एक रुग्णही होता. संबंधित रुग्णाला उपचारासाठी अमरावती याठिकाणी नेण्यात येत होते. परंतु, वाटेतच हा अपघात घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.

रुग्णवाहिकेला कशामुळे आग लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. रुग्णवाहिकेत अमोल तट्टे नावाचा रुग्ण होता. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने पुढील उपचारासाठी लेहगाववरून अमरावतीला नेण्यात येत होते. सोमवारी सकाळी पंचवटी चौकातून जात असताना चालकास काहीतरी जळाल्याचा वास आला. चालकाने रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला उभी केली.

अधिक वाचा - ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही’ हा भ्रम चुकीचा; पोस्टकोविड परिणामांची वेळीच काळजी घ्या 

रस्त्याच्या बाजूला रुग्णवाहिका उभी करून पाहणी केली असता रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे निदर्शनास आले. चालकाने क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिकेतील रुग्ण अमोल तट्टे याला बाहेर काढले. रुग्णाला बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेचा पुढील भाग जळून खाक झाला. त्यानंतर वाहन चालक विक्की तंतरपाळे यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलिस तसेच युवक काँग्रेसचे मोर्शी अध्यक्ष पवन काळमेघ यांच्या काही कार्यकत्र्यांच्या मदतीने ही आग विझवली. आगीचे कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वाढत्या उष्णतेमुळे घडली असावी घटना

संबंधित रुग्णवाहिका अवघी दोन महिने जुनी होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निधीतून दोन महिन्यांपूर्वी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. या रुग्णवाहिकेला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीतील वाढत्या उष्णतेमुळे अशा घटना वाढत आहेत.