...अन् चालकाने घेतली धावत्या रुग्णवाहिकेतून उडी; नंतर घडला हा प्रकार

टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

जीव वाचविण्यासाठी कुंदनने चालत्या वाहनातून उडी मारून पळ काढला. या करणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता साटोडा चौकासमोर रिकाम्या प्लॉटमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आली.

वर्धा : रुग्णवाहिकेचा चालक रुग्णाला आणण्यासाठी जात होता. वाटेत त्याला एक फोन आला. तो फोनवर बोलत असताना एकाने त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. नंतर रुग्णवाहिका स्वतः चालवत नेऊन साटोडा शिवारात ती पेटवून दिली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक कंदन रूपचंद कोकाटे हा रुग्णाला आणण्यासाठी शास्त्री चौकाकडे जात होता. मोबाईलवर फोन आल्याने त्याने सरकारी दवाखान्यासमोर वाहन उभे केले आणि बोलत होता. यावेळी संघर्ष लोखंडे हा त्याच्या तीन मित्रांसह तेथे आला आणि ‘तुझा मालक कुठे आहे’, असे कुंदनला विचारले.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

‘तुझा मालक तन्मय मेश्रामने माझ्या बहिणीला पळवून नेले. ते कुठे आहेत, सांग’, असे म्हणत कुंदनच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर संघर्षने स्वतः रुग्णवाहिका डाक कार्यालयाच्या चौकाकडे नेली. जीव वाचविण्यासाठी कुंदनने चालत्या वाहनातून उडी मारून पळ काढला. या करणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता साटोडा चौकासमोर रिकाम्या प्लॉटमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आली.

संघर्ष लोखंडे आणि त्याच्या साथीदारांनीच रुग्णवाहिका जाळल्याचे तपासात निष्पन्न झाले. शहर पोलिसांना या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून चालकावर हल्ला आणि रुग्णवाहिका जाळल्याचे पोलिसांनी सांगितले. पण या सर्व भानगडीत प्रेम प्रकरण नेमके काय आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

चालकाने घेतली धावत्या गाडीतून उडी

तीन ते चार जणांनी ‘तुझा मालक तन्मय मेश्रामने माझ्या बहिणीला पळवून नेले. ते कुठे आहेत, सांग’, असे म्हणत कुंदनच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वतः रुग्णवाहिका घेऊन जाऊ लागले. जीव वाचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने धावत्या गाडीतून उडी टाकून जीव वाचवला व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance driver stabbed in love affair